ग्रामपंचायत कार्यालय, मंगरूळ

आता मंगरूळ ग्रामपंचायतीचे सर्व निर्णय, विकास कामे, शासकीय योजना आणि नागरिक सेवा — सर्व काही एका क्लिकवर उपलब्ध!

गावाची माहिती

ग्रामपंचायत

मंगरूळ

स्थापना

1962

क्षेत्रफळ

हे.

तालुका

माजलगाव

जिल्हा

बीड

राज्य

महाराष्ट्र

लोकसंख्या

2991

स्त्री

1441

पुरुष

1550

कुटुंब संख्या

626

शेतकरी संख्या

733

मतदारांची संख्या

2452

लागवडी योग्य क्षेत्र

1093.22 हे.

बागायत क्षेत्र

325 हे

स्ट्रीट लाईट पोल

165

अंगणवाडी

5

जिल्हा शाळा

5

आरोग्य केंद्र

1

पोस्ट ऑफिस

1

तलाठी ऑफिस

1

नळ कनेक्शन

258

सार्वजनिक विहीर

3

सार्वजनिक बोअर

सार्वजनिक पाण्याची आड

-

महिला बचत गट

19

प्रधानमंत्री घरकुल लाभार्थी

416

दृष्टीकोन

गावाच्या सर्वांगीण, शाश्वत व समावेशक विकासासाठी कटिबद्ध राहून प्रत्येक नागरिकाला शिक्षण, आरोग्य, पोषण, स्वच्छता, रोजगार व सुरक्षित पर्यावरण उपलब्ध करून देणे. पारदर्शक, उत्तरदायी व लोकसहभागावर आधारित प्रशासनाद्वारे आर्थिक स्वावलंबन, सामाजिक समता व सांस्कृतिक जतन साध्य करणे—हेच आमचे दृष्टीकोन आहे.

मिशन

नागरिकांच्या सक्रिय सहभागातून गावाचा सर्वांगीण विकास साध्य करणे; गुणवत्तापूर्ण शिक्षण व आरोग्यसेवा, संतुलित पोषण, स्वच्छता व पर्यावरण संवर्धन यांना प्राधान्य देणे; रोजगारनिर्मिती व कौशल्यविकासाद्वारे आर्थिक स्वावलंबन वाढवणे; तंत्रज्ञानाचा उपयोग करून पारदर्शक, कार्यक्षम व उत्तरदायी प्रशासन राबवणे; आणि सामाजिक सलोखा, समान संधी व सांस्कृतिक मूल्यांचे जतन सुनिश्चित करणे.

सरकारी योजना

ग्रामपंचायत मंगरूळ मार्फत नागरिकांसाठी विविध शासकीय योजना राबवल्या जातात. या योजनांद्वारे शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, शेती विकास, पाणीपुरवठा आणि रोजगारनिर्मिती यांसारख्या क्षेत्रांत नागरिकांना मदत मिळते. प्रत्येक कुटुंबापर्यंत शासनाच्या सुविधा पोहोचवणे हा आमचा उद्देश आहे.

ग्रामपंचायत पदाधिकारी

सरपंच

छगण मेघा चव्हाण

उपसरपंच

स्नेहल प्रदिप घाटुळ

ग्रामपंचायत अधिकारी

संजय रामभाऊ साळवे

ग्रामपंचायत सेवा

ग्रामपंचायत गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, प्राथमिक आरोग्यसेवा आणि शिक्षण यांसारख्या सेवा वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीने पुरवून सर्वांगीण विकास साधण्यावर लक्ष केंद्रित करते. गावकऱ्यांच्या गरजा आणि कल्याण हे आमचे प्रमुख प्राधान्य आहे.

पाणीपुरवठा सेवा

ग्रामपंचायत गावातील स्वच्छ पाणीपुरवठ्याची व्यवस्था करते आणि त्याची नियमित देखभाल सुनिश्चित करते, ज्यामुळे नागरिकांना सुरक्षित आणि पुरेसे पाणी उपलब्ध राहते.

कचरा व्यवस्थापन व स्वच्छता

ग्रामपंचायत कचरा संकलन, व्यवस्थापन आणि गावात स्वच्छता राखण्यासाठी विविध मोहीम राबवते, ज्यामुळे पर्यावरण स्वच्छ राहते आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहते.

शिक्षणविषयक सेवा

ग्रामपंचायत शाळा सुविधा सुधारते आणि शिक्षणाच्या दर्जा वृद्धीसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवते.

स्मशानभूमी व्यवस्थापन

ग्रामपंचायत गावातील अंतिम संस्कारासाठी आवश्यक जागेची व्यवस्था करते आणि तिचे नियमन, देखभाल व व्यवस्थापन सुनिश्चित करते, ज्यामुळे गावकऱ्यांना सोयीसुविधा मिळतात.

अग्निशमन सेवा

ग्रामपंचायत आग लागल्यास त्वरित प्रतिसाद देऊन मदत उपलब्ध करून देते आणि आपत्ती नियंत्रणासाठी आवश्यक पावले उचलते.

वाढदिवस, विवाह, मृत्यू नोंदणी

ग्रामपंचायत गावातील जन्म , विवाह आणि मृत्यू यांची नोंदणी करते.

विविध दाखले मिळविण्यासाठी
ऑनलाईन अर्ज

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश- २०१५ नुसार ऑनलाईन पद्धतीने जन्म नोंद/ मृत्यू नोंद/ विवाह नोंदणी दाखला/ दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला/ ग्रामपंचायत येणे बाकी दाखला/ ८ अ उतारा/ निराधार असल्याचा दाखला मागणी करण्यासाठी खालील फॉर्म भरुन पाठवा.


आमचे स्थान

मंगरूळ ता .माजलगाव जि . बीड